Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

Admin | 12 views
इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २६ एप्रिल, २०२६ रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. सातवी) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती

या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल. हे निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी/ आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता ७ ते १४ मे २०२६ या कालावधीची मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर निवेदन स्वीकारले जाणार नाही. तसेच ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी/ आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

 

 


Join WhatsApp