Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Admin | 18 views
ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २९ – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक सोबत संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण ही पदे शिक्षक संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्रालयात  याविषयी झालेल्या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील इतर विद्यापीठामध्ये ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण यांना शिक्षक संवर्गात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी अशाच नियमानुसार कार्यवाही व्हावी. यासाठी केंद्रीय वैद्यकीय परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 


Join WhatsApp