Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

दिव्यांगांच्या रोजगार व स्वउद्योगासाठी शासन कटिबद्ध – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

Admin | 13 views
दिव्यांगांच्या रोजगार व स्वउद्योगासाठी शासन कटिबद्ध – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २९ : दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर त्यांना स्थिर रोजगार व उद्योजकतेच्या संधी देऊन सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्यातील दिव्यांग बांधवांना रोजगार आणि स्वउद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ६१ वी बैठक दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, दूरदृश्य प्रणालीद्वारे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त समीर कुर्तकोटी, दिव्यांग कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल, उपसचिव सुनंदा घड्याळे उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, दिव्यांग कल्याण विभागामार्फत रोजगार व स्वउद्योगाशी संबंधित विविध योजना राबविण्यात येत आहेत. पर्यावरणस्नेही फिरते वाहनावरील दुकान या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. दिव्यांग युवकांना त्यांच्या क्षमतांनुसार व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून या माध्यमातून दिव्यांग तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

या बैठकीत 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षाचे अंतर्गत लेखा परीक्षकांनी सादर केलेल्या लेखांना मान्यता देणे, महामंडळाच्या प्रशासन खर्चास मंजुरी देणे तसेच महामंडळाच्या योजनाबाबत चर्चा करण्यात आली.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 


Join WhatsApp