Pune | Wed, 24 June 2026

No Ad Available

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

Admin | 26 views
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. १९: हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -1 जितेंद्र भोळे आणि सचिव-3 डॉ.विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Oplus_131072

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय याचे सचिव -4 शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब,  संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शिवरायांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी, सनई, चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

०००


ताज्या बातम्या

Join WhatsApp