Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विधान भवनात अभिवादन

Admin | 25 views
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विधान भवनात अभिवादन

नागपूर, दि.६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनात त्यांना अभिवादन करण्यात आले.

विधान भवनात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव-1) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मेघना तळेकर (इटकेलवार) (सचिव-2),डॉ. विलास आठवले (सचिव-3) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-4) यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000


Join WhatsApp