Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचे आवाहन

Admin | 14 views
बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचे आवाहन

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 15 मे तर विलंब शुल्कासह 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी कळविले आहे.

या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै 2026 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे 21 मे 2026 पर्यंत रक्कम भरावयाची असून 25 मे 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करावयाच्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

 


Join WhatsApp