Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री आदिती तटकरे

Admin | 12 views
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ७ : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या  प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेत मंत्रालय येथील दालनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात बैठक झाली. बैठकीत एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि.रा.ठाकूर, अवर सचिव श्री. कुलकर्णी, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अनिल ढुमणे आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने  होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

याशिवाय प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनश्रेणी आणि इतर सुविधा, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा, भाऊबीजऐवजी एक महिन्याचा पगार, रिक्त पदे भरणे, पदोन्नती आणि आजारपणाची रजा या मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ


Join WhatsApp