Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Admin | 6 views
आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. 16 : स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामार्फत  ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी सहा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार स्नेहा दुबे, आमदार परिणय फुके यांच्यासह स्व. लीलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेत देण्यात येत असलेल्या रुग्णवाहिकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्याचा गौरव केला. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आदिवासी भागातील दुर्गम, डोंगराळ गावामध्ये सहजरित्या रुग्णवाहिकेची सेवा मिळणार असल्याने आदिवासी बांधवांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार उपलब्ध होण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

००००

निलेश तायडे/विसंअ


Join WhatsApp