Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

‘युवा संवाद’ उपक्रमाचा २१ एप्रिलला उद्घाटन होणार; पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन

Admin | 1 views
‘युवा संवाद’ उपक्रमाचा २१ एप्रिलला उद्घाटन होणार; पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन

यवतमाळ दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘युवा संवाद’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन येत्या 21 एप्रिल रोजी होणार आहे. या उपक्रमा च्या अनुषंगाने निर्माण केलेल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते गुरुवारी महसूल भवनात करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना स्पर्धा परीक्षा तसेच करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. या कार्यक्रमात आयएएस व आयपीएस अधिकारी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा युवा संवाद कार्यक्रम बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 ते 2 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक तरुणांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या माहिती पत्रक प्रकाशनवेळी  जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, पूनम अहिरे, सीएम फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी, कुणाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन शासकीय वाहने तहसीलदारांना सुपूर्द

तत्पूर्वी पालकमंत्री ना. संजय राठोड,  आदिवासी विकासमंत्री ना.अशोक उईके आणि आ. किसन वानखेडे आ. बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शासकीय कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी नवीन शासकीय वाहनांचे लोकार्पण करून सदरील वाहने संबंधित तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आली.

000


Join WhatsApp