
बीड, दि. १७ (जिमाका) : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महिलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार करुन ‘सशक्त नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील धार येथून करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून आपली ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, आमदार नमिता मुंदडा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.

०००
