Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

‘नाबार्ड’अंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

Admin | 26 views
‘नाबार्ड’अंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

मुंबई, दि. ११ :- ‘नाबार्ड’अंतर्गत होणाऱ्या सिंचन प्रकल्पांचे नियोजन, मंजुरी आणि कामे जलद गतीने करून या प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

नाबार्ड अंतर्गत (low hanging fruit project) प्रस्तावाच्या सद्यस्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. गुणाले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव प्रसाद नार्वेकर, संजीव टाटू, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ज्या प्रकल्पांची कामे अंतिम टप्यात आहेत त्या प्रकल्पाच्या कामांना प्राधान्य द्यावे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच २०२५-२६ व २०२६-२७ मध्ये पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांचे कामे गतीने करून हे प्रकल्प एक वर्षात पूर्ण करण्याबाबत नियोजन  होणे आवश्यक आहे. एका वर्षात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची वेगळी सूची करून त्यानुसार त्या प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. या प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने या कामांना गती द्यावी. प्रकल्पांच्या कामांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करावा, तसेच आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल.

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. प्रस्तावित कामांची माहिती, सर्वेक्षण, अन्वेषण याबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडील पाणीपट्टी वसुलीबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. यासंदर्भात प्रत्येक कार्यकारी अभियंता स्तरावर टास्क फोर्स स्थापन केला जावा, असे निर्देशही श्री. विखे-पाटील यांनी दिले.

कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प, बांधकाम, व्यवस्थापन, यांत्रिकी, विद्युत, गुणनियंत्रण इत्यादी सर्व शाखांचे एकत्रिकरण करुन शासनाच्या इतर विभागांप्रमाणे आस्थापनेची पुर्नरचना करणे तसेच कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून (वर्ग-३) पदांच्या प्रलंबित मागणीसंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ/


Join WhatsApp