
मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत पुढील समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत ज्येष्ठ निवेदक दिपक वेलणकर यांनी घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायासाठी कार्य करणारे वैधानिक मंडळ आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेला हा आयोग, महिलांच्या समाजातील स्थिती व प्रतिष्ठा उंचावण्यासाठी, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच महिलांवर व बालकांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. गरजू महिलांना समुपदेशन आणि नि:शुल्क कायदेशीर मदत पुरविणे हेही आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्याअनुषंगाने‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून महिला आयोगाच्या अध्यक्षरुपाली चाकणकर यांनी आयोगाची कार्यपद्धती, सुरू असलेले उपक्रम, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचलण्यात आलेली धोरणात्मक पावले आणि भावी दिशा याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/स.सं
